शिक्षण क्रांतीचा ' दिल्ली पॅटर्न ' जिल्ह्यात राबविणार


भोर 

दिल्ली सरकारने विस्कटलेली सार्वजनिक शिक्षण व्यवस्था सातत्यपूर्ण आणि नियोजनपूर्वक प्रयत्न करून सुधारली आहे. प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत केला असून शिक्षण क्रांतीचा दिल्ली पॅटर्न जिल्ह्यात राबवणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी केले.

शिवतरे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला असून दिल्ली सरकारने शिक्षण सुधार कार्यक्रमांतर्गत  राबविलेल्या विविध शैक्षणिक उपाय योजनांची माहिती शिवतरे यांनी दिल्ली दौर्‍यात करून घेतली त्याविषयी ते बोलत होते.ते म्हणाले, दिल्ली सरकारने शिक्षणासाठी अर्थसंकल्पात वाढ करण्याबरोबरच पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, शिक्षकांची क्षमता वाढविणे ,जबाबदार शालेय प्रशासन बनवणे,शिक्षणाची परिणामकारकता वाढविणे,या प्रमुख चार गोष्टीवर गोष्टींवर लक्ष केंद्रित केले असून विविध अध्यापन कौशल्य विकसित करून उत्तीर्णची टक्केवारी ७ % वाढवली आहे.आपण या अगोदरच काही गोष्टींचा पुणे जिल्हा परिषदेच्या १० कलमी शिक्षण सुधार कार्यक्रमात समावेश केला असून आवश्यकतेनुसार शिक्षण क्रांतीचा दिल्ली पॅटर्न जिल्ह्यात राबवू असे ते पुढे म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या