कोजागिरी निमित्त रंगला दांडिया, गरबा


नगर प्रतिनिधी

फर्स्ट स्टेप प्री-प्रायमरी स्कूलच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दांडिया आणि गरबा नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी पारंपारिक वस्त्र परिधान करुन दांडिया आणि गरबाचा आनंद लुटला.

त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत महिलांना सजग करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. स्कूलच्या संचालिका मोनिका कुसळकर यांच्या संकल्पनेतून हा महिलांसाठी कार्यक्रम राबविण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत हृदय बंद पडल्यास प्रथम उपचार म्हणून जीवन संजीवनी क्रियाचे प्रात्यक्षिक भूलतज्ञ संघटनेच्या डॉ. दिपाली फलके आणि डॉ. राऊत यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तर 108 नंबरच्या रुग्णवाहिकेबद्दल माहिती दिली. रक्तदानाचे महत्त्व डॉ. बागले यांनी विशद केले. यावेळी केडगाव जागृक मंचचे विशाल पाचरणे यांनी महिलांसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षिका सारिका गाडे यांनी स्त्री जन्म ही स्वरचित कविता सादर करुन सूत्रसंचालन केले. यावेळी महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या