दिवाळीसाठी शेतकर्‍यांनी सोयाबीन काढले विक्रीला


कासार पिंपळगाव

पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव,हनुमान टाकळी,साकेगाव,चितळी,पाडळी,सुसरे परीसरात सोयाबीन पिक घेण्यात आले.पिक घेण्यासाठी 

सोयाबीन पिकास अंदाजे एकरी बारा हजार खर्च झाला. एवढा खर्च करूनही सततच्या पावसाने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली.

यंदातरी सोयाबीनला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी उराशी बाळगली होती. मात्र, सोयाबीनचे दर घसरले. त्यात दिवाळी तोंडावर आल्याने नाईलाजाने शेतकर्‍यांपुढे सोयाबीन विकणे हाच पर्याय असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे बाजारात सध्या सोयाबीनची मोठी आवक झाल्याचे दिसून येत आहे.

 बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली. मात्र, अनेक शेतकर्‍यांचे सोयाबीन पावसात सापडल्याने काळपट झालेे. वातावरणात होणार्‍या बदलांमुळे सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा आहे. यावर्षी सतत पाऊस आणि परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान केले. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे.

 शेतमालाची साठवणूक करून विक्री केल्यास चांगला भाव मिळतो. पण दिवाळी सण साजरा करण्यासाठी मिळेल त्या भावात शेतकर्‍यांना सोयाबीन विकावे लागत असल्याची शेतकऱ्यांकडून  माहिती मिळत आहे.

वेगवेगळ्या दरांबाबत शेतकरी संभ'मावस्थेत आहेत. दरांमध्ये सातत्याने तफावत दिसून येते. मात्र याबाबत काही जाणकारांसोबत चर्चा केली असता त्यांनी सोयाबीनच्या गुणवत्तेनुसार दर देत असल्याने विक्रीस आलेले सोयाबीन तपासून भाव देत असल्याचे सांगितले. उर्वरित हजारो क्विंटल सोयाबीनला सरासरी 4500 पासून 5100 पर्यंत भाव मिळत आहे. काहीजण बियाण्यासाठी खरेदी करून महामंडळ, बियाणे कंपन्यांना पुरवठ्याचे काम करतात. तर वाढीव दरांच्या पावत्या सध्या समाज माध्यमातून फिरत असल्याने शेतकर्‍यांमध्ये उलटसुलट चर्चा आहे.


एकरी 3 ते 4 क्किंटल सोयाबीन झाल्याने काही शेतकर्‍यांना मोठे नुकसान झाले. सोयाबीनला 4500 ते 5100 भाव तर तुरीला 6100 रुपये भाव सद्या मिळत आहे.असे व्यापारी किरण नागरे यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या