.....अखेर मनसेने ते काम बंद पाडले

विद्युत लाईनचे काम चुकीचे असल्याचे आरोप


नसरापूर प्रतिनिधी

मोहरी फिडर तसेच खेड शिवापुर  33 केवी ची जाणारी लाईन करंदी रोड ला लगत कामथडी गावच्या हद्दीत उभे केलेल्या विद्युत लाईनचे काम सुरू आहे. या ठिकाणच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केलेली आहे ,नसरापूर वनविभागाची याबाबत कोणतीही परवानगी ठेकेदाराने काढलेली नाही . उभे केलेले खांब पूर्णपणे गटारात उभे केले आहे. पोल उभे करताना ते फरपटत नेले जातात .याबाबत मनसेचे पुणेचे सहकार  जिल्हाध्यक्ष विलास बोरगे यांनी ते काम थांबवले असून मनसेचा दणका त्यांनी ठेकेदाराला दिला आहे.तसेच खांब एका रेषेत उभे न करता वाकडे तिकडे उभारले आहेत. काही ठिकाणी विद्युत केबल वायर उघड्यावरती पडलेल्या आहेत.तसेच या लाईनच्या तारा देखील ढिल्या   आहेत . पावसाळ्यात हे काम सुरू असताना संबंधित ठेकेदार यांनी खोलवर  खड्डे  न घेता  खांब उभे केले. आवश्यक ठिकाणी  सपोर्ट खांब दिला गेला नाही . त्यामुळे ही लाईन कधीही आणि केव्हाही कोसळू शकते.तसेच पोल उभे करताना आवश्यक ती सिमेंट वापरले गेले नाही. त्यामुळे खांब नुसते उभे केले  असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे .तसेच या भागातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी याबाबत ठेकेदाराला वारंवार सुचना केली की ,हे खांब किंवा आपण लाइन ओढताना आपण जे खड्डे घेता, त्याची माती रस्त्यावर का टाकता. त्यामुळे रस्ता चिखलमय  झाला होता त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत होता.

त्यासाठी  बाहेर काढलेली माती रस्त्यावर न टाकता ती पुन्हा खड्ड्यात टाकावी असे नागरिकांनी सांगितले. मात्र  ठेकेदाराने दूर्लक्ष  केले, ठेकेदाराने केलेल्या चुकीच्या कामामुळे व त्याच्या येणाऱ्या अवजड गाड्यांमुळे करंदी खे. बा. चा   रस्ता खराब झाला आहे. असे विलास बोरगे व  नागरिकांचे म्हणणे  आहे.

ठेकेदाराचे असणारे कर्मचारी यांनी पोल  उभा करण्यासाठी पोल  गाडी च्या साह्याने  नेणे अपेक्षित असताना कंत्राटदाराने रस्त्यावरून फरफटत चालवला होता.काही पोल रस्त्यालगत टाकल्याने दुचाकीस्वार जखमी झाला होता. त्याकडे पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष विलास बापू बोरगे या सर्व बाबींकडे लक्ष वेधून  हे काम बंद पाडत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व ठेकेदारयांनी  चुकीची केलेले काम व राहिलेल्या उणिवा दुरुस्त कराव्यात, तरच हे काम सुरू करावे असे विलासबापू बोरगे यांनी सांगितले.

शेतकऱ्याला शेतातून  व घराजवळचा  पोल शिफ्टिंग करायचा असेल तर एम एस सी एम एस सी बी हजारो रुपये त्यासाठी घेते व एखाद्या ठिकाणी शेतकऱ्याला विद्युत लाईन घ्यायची असेल त्यासाठी पोल बसवण्याचे  हजारो रुपये घेतात. मात्र शेतकऱ्यांना न विचारता शेतकऱ्यांच्या बांधावर व त्यांच्या जागेत महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी आणि त्यांचे ठेकेदार मनमानी पद्धतीने पोल लावून शेतकऱ्यांचे व नागरिकांचे शोषण करताना दिसत आहे. असा आरोप शेतकरी उमेशबापू बोरगे व भानुदास थिटे यांनी केला आहे.

नसरापूर चे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चे उपविभागीय अधिकारी नवनाथ घाटुळे यांनी सांगितले की, आज  संबंधित जागेवरती येऊन पाहणी करून त्यात आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या जातील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या