ढोरजळगांव
आबासाहेब काकडे शिक्षण समूहाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2021-2022 पासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या दि फ्रेंडस ऑफ दि डिप्रेस्ड लीगचे निर्मला काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव या महाविद्यालयात बुधवार 20 ऑक्टोबर रोजी विद्यार्थी स्वागत समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे संस्थापक कर्मयोगी आबासाहेब काकडे, संस्थापिका निर्मला काकडे आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित प्रमुख, सर्व पालक व सर्व विद्यार्थी यांचे पेन गुलाब पुष्प व पेढा भरवून स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रा. सुनील आढाव यांनी 1969 साली शेवगाव येथे वरीष्ठ महाविद्यालय व्हावे यासाठी कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी पाहिलेले स्वप्न व केलेले प्रयत्न आणि त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या प्रयत्नांना आबासाहेब काकडे शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा. विद्याधर जी काकडे व जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी कसे मूर्त स्वरूप दिले विद्यार्थ्यांनी कॉलेज करत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी देखील चालू ठेवावी याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनाविषयी व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पृथ्वीसिंग काकडे, शुभांगी पाटील, अलकनंदा आव्हाड , अनिल पाटील, रमेश पवार ,प्राचार्य एम. के . फसले, प्राध्यापक शिवाजीराव लांडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष निजवे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. शितल शेरकर यांनी केले.
0 टिप्पण्या