जम्मू
काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोठा दावा केला आहे. सत्यपाल मलिक यांनी दावा केला आहे की, जम्मू -काश्मीरचे राज्यपाल असताना अंबानी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातल्या एका उच्चपदस्थ व्यक्तीशी संबंधित फाईल मंजूर करण्याच्या बदल्यात त्यांना ३०० कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती. मात्र कायद्यात न बसणारे कुठलेही काम आपण करणार नाही असे सांगत आपण ती ऑफर फेटाळल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजस्थानच्या झुंझुनूमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल होते तर सध्या ते मेघालयमध्ये राज्यपाल आहेत. सत्यपाल मलिक हे आपल्या बेधडक बोलण्याने सातत्याने चर्चेत असतात. या कार्यक्रमात उपस्थित असलेले सत्यपाल मलिक म्हणाले, ‘काश्मीरला गेल्यानंतर माझ्याकडे दोन फायली आल्या. एक अंबानींची फाईल होती आणि दुसरी आरएसएसशी संबंधित होती जी आधीच्या मेहबूबा मुफ्ती-भाजप युती सरकारमध्ये मंत्री होती. सत्यपाल मलिक पुढे म्हणाले, ‘मला सचिवांनी कळवले की यामध्ये घोटाळा झाला आहे आणि मग मी दोन्ही करार रद्द केले. सचिवांनी मला सांगितले की दोन्ही फाईल्ससाठी १५०-१५० कोटी रुपये दिले जातील. पण मी त्याला सांगितले की, मी ५ कुर्ता-पायजामा घेऊन आलो आहे आणि फक्त एवढेच घेऊन जाईन.
तथापि, मेघालयचे विद्यमान राज्यपाल यांनी हे काम नेमके कुठल्या संदर्भातले होते, या दोन फायलींचा तपशीलवार उलगडा त्यांनी केला नसला तरी अनिल अंबानी यांच्या कंपनीचे हे काम असल्याचा दावा केला आहे. असे म्हटले जात आहे की मलिक सरकारी कर्मचारी, पेन्शनर आणि पत्रकारांसाठी आणलेल्या गट आरोग्य विमा पॉलिसीशी संबंधित फाईलचा संदर्भ देत होते. ज्यासाठी सरकारने अनिल अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जनरल इन्शुरन्ससोबत करार केला होता.
ऑक्टोबर २०१८ मध्ये, जेव्हा सत्यपाल मलिक जम्मू -काश्मीरचे राज्यपाल होते, तेव्हा त्यांनी काहीतरी चुकीचा अंदाज घेऊन रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीशी केलेला करार रद्द केला. दोन दिवसांनंतर, राज्यपालांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या कराराबद्दल माहिती दिली आणि त्यामध्ये करारामध्ये काही भ्रष्टाचार आहे का याची तळाशी चौकशी करण्यास सांगितले. सत्यपाल मलिक म्हणाले, “खबरदारी म्हणून, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या दोन फायलींविषयी त्यांना माहिती देण्यासाठी वेळ घेतला आणि त्यात सहभागी असलेले त्यांची नावे घेत असल्याचेही सांगितले. मी त्याला थेट सांगितले की मी पदावरून पायउतार होण्यास तयार आहे पण मी या फायलींना ग्रीन सिग्नल देणार नाहि असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या