ऑस्करच्या यादीतून वगळला 'सरदार उधम'


मुंबई 

विकी कौशलचा ‘सरदार उधम’ हा चित्रपट ऑस्करच्या प्रवेशासाठी वगळण्यात आला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरींनी हा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात ब्रिटिशांबद्दल द्वेष दाखवण्यात आला आहे, असे ज्युरीचे म्हणणे आहे. ही बातमी आल्यापासून चाहते चांगलेच संतापले आहेत. 

हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झाला. यात शॉन स्कॉट, बनिता संधू, कर्स्टी एव्हर्टन आणि स्टीफन होगन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील विकी कौशलचा अभिनयही चांगलाच गाजला आहे. पण आता ज्युरींनी हा चित्रपट ऑस्कर २०२२ च्या नामांकनातून वगळला आहे. ब्रिटिशांबद्दलचा द्वेष दाखवण्यात आल्याचे कारण ज्युरींनी सांगितले आहे. शूजित सरकारच्या या चित्रपटाची निर्मिती रॉनी लाहिरी आणि शील कुमार यांनी केली आहे. ज्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.

ऑस्कर पुरस्कारांसाठी अधिकृत प्रवेश निवडलेल्या समितीचे सदस्य इंद्रदीप दासगुप्ता यांनी सरदार उधम यांना नाकारण्याचे कारण सांगितले आणि ते म्हणाले, सरदार उधम हा चित्रपट आणि जालियनवाला बाग घटनेवर आधारित आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका अनसन्ग नायकावर एक भव्य चित्रपट बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे, पण या प्रक्रियेत आपला इंग्रजांबद्दलचा द्वेष समोर येतो. जागतिकीकरणाच्या या युगात एवढा द्वेष बाळगणे ही चांगली गोष्ट नाही. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या