राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी रूपाली पानसरे


आळंदी 

आळंदी शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी रुपाली अतुल पानसरे यांची नुकतीच निवड करण्यात आली.पानसरे यांना शहराध्यक्षापदी निवड झाल्याचे निवडपत्र पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे यांच्या हस्ते देण्यात आले.

रुपाली पानसरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदावर काम केले आहे त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून गोरगरिबांना न्याय देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहे, मागील काळात महिलांचे संघटन खूप चांगल्या प्रकारे करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी अतिशय शिस्तबद्ध प्रचार करून पक्ष संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले.

यावेळी रुपाली पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहचवून महिला संघटन अधिक बळकट करण्याचा प्रयत्न वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे सांगितले.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून खा.सुप्रियाताई सुळे,प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर,आमदार दिलीप मोहीते,जिल्हाअध्यक्षा भारती शेवाळे यांचे माध्यमातून महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नुतन शहराध्यक्षा रुपाली पानसरे यांनी सांगितले.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा मोहीते, माजी विरोधीपक्षनेते डि.डी.भोसले, आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुंडरे, नगरसेवक प्रकाश कु-हाडे, पुष्पाताई कु-हाडे, सागर रानवडे,सतिष कु-हाडे, धनंजय घुंडरे, सिध्देश कु-हाडे यांनी तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या