खेड (ता.) प्रतिनिधी
खेड तालुक्यात प्रवेश करणाऱ्या सीमेवरील मोशी आणि चांडोलीतील टोलनाका शनिवार दि. ९ ऑक्टोबर २०२१ पासून बंद झाला आहे. भारतीय राजपत्र (सं १३०५ १५ डिसेंबर २००५ नुसार मोशी व चांडोली या दोन्ही टोलनाका प्रकल्पाची मुदत संपल्याने आयआरबी कंपनीने शुक्रवार रात्री १२ वाजल्यापासून टोल वसुली बंद केली. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून या टोल नाक्यावरील वसुली दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका झाली आहे. तब्बल सोळा वर्षे येथे टोल वसूली करण्यात येत होती. मोशी आणि चांडोली येथील टोल नाक्यावर जुन्नर, खेड, आंबेगाव या तीनही तालुक्यातील ग्रामीण भागातून शहराकडे जाणारे आणि येणारे व पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराकडून चाकण औद्योगिक परिसराकडे येणाऱ्या जाणार्या वाहनचालकांना टोल भरण्यासाठी थांबावे लागत होते. बऱ्याचवेळा केवळ टोल वसुलीपोटी वाहनांच्या रांगा बऱ्याच दूर पर्यंत लागून रस्ते कोंडीमय होत होते. या निर्णयामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पाहायला मिळत आहेत.
0 टिप्पण्या