बोधेगाव प्रतिनिधी
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षाच्या परिस्थितीमध्ये लोककलावंताची परिस्थिती खूपच बिकट बनली. अनेक हाल अपेष्टा या कालावधीत त्यांनी सहन केल्या. रंगभूमी, नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम यांना जशा पद्धतीने सरकारने परवानगी दिली तशा पध्दतीने हजारांच्या वर उपजीविकेचे साधन असलेल्या तमाशाला देखील शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी हरिभाऊ बडे लोकनाट्य तमाशा कलावंतांची संचालिका शिवकन्या बडे यांनी शासनाकडे केली आहे.
सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलावंतांना प्रेक्षकांचा सामना करावा लागत नाही. परंतु तमाशा मंडळातील प्रत्येक कलावंताना कला सादर करताना त्यांचा सामना करावा लागतो.
दरम्यान एका तमाशावरती १ हजाराच्या आसपास लोकं आपली उपजीविकेका करत असल्याने आणि एका यात्रेत ५ हजाराच्या आसपास लोकं आपली पोट भरत आहेत, त्यामुळे शासनाने जास्तीचा कालावधी न लावता यावर निर्णय घेउन तमाशा बरोबर यात्रेला देखील परवानगी मिळावी अशी मागणी शिवकन्या बडे यांनी बोधेगाव येथिल बन्नोमॉ यात्रेतील हजेऱ्या संपन्न झाल्यानंतर व्यक्त केली. यावेळी बन्नोमॉ यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष कुंडलिकराव घोरतळे, रामजी केसभट, जयदीप घोरतळे, अनिल घोरतळे, प्रकाश काळे, पेंटर जाधव, सचिव अभय चव्हाण उपस्थित होते.
0 टिप्पण्या