अधिकृत मीटर धारकांची बत्ती गुल

आकडेधारक विजचोर मात्र जोमात


वार्ताहर नेवासा

सबंध जगभरामध्ये विजेची टंचाई लक्षात घेता ग्राहकांवर पडणारा अतिरिक्त आणि वाढीव बिलाचा भार दिवसेगणिक वाढतच आहे.

त्यातच आता  कोळशाच्या टंचाईमुळे चंद्रपूर येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र पुरेशा प्रमाणात वीजनिर्मिती करू शकणार नाही. त्यामुळे सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रावर विजेचे फार मोठे संकट ओढावले आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी सुद्धा याची पुष्टी केली आहे.

महाराष्ट्रामध्ये पाहायचं झालं तर  अनेक खेडेगावांमध्ये    आजही मोठ्या प्रमाणात आजही मोठ्या प्रमाणात  विजचोरी होते. फक्त नेवासा तालुक्यामध्ये जेवढी छोटी  गावे असतील प्रत्येक गावामध्ये किमान नव्वद टक्के लोक गेल्या कित्येक वर्षांपासून आकडा टाकून विजेची चोरी करताना आढळून येतात. वीज कर्मचारी, अधिकारी यांच्या निदर्शनास ही गोष्ट येत असली तरीही कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. मोठमोठ्या धेंडांना मात्र मोठ्या प्रमाणात दंड आकारण्याचे काम वीज वितरण कंपनी करत असली तरी  कित्येक हजार युनिट विज ही आकडा टाकून वापरली जाते. काही गावांमध्ये तर अशी परिस्थिती आहे की ,त्या गावामध्ये २०० कुटुंब वास्तव्यास आहेत, पण अधिकृत मीटर मात्र पाचच लोकांकडे आहे. बाकी सर्व कित्येक वर्षापासून आकडा टाकून वीज चोरी करताना दिसतात. आता ही गोष्ट  अधिकृत मीटर धारकांच्या समजण्यापलीकडचे आहे . नुकतंच वीज वितरण कंपनीने बिल भरले नाही म्हणून अनेक मीटर धारकांचे वीज कनेक्शन कट केले,पण आकडा धारकांवर मात्र कुणाची मेहेरनजर आहे ?या प्रश्नाचे उत्तर वीज वितरण कंपनीकडून  येणे बाकी आहे.


महावितरणच्या अधिकार्यांनी  आणि कर्मचाऱ्यांनी  लवकरात लवकर  आकडा टाकणाऱ्यांवर,  वीजचोरी करणाऱ्यांवर  कारवाई करावी, अन्यथा  येणाऱ्या काळात याच गोष्टींमुळे वीज वितरण कंपनीविरुद्ध  अधिकृत मिटरधारक असा संघर्ष  पेटण्याची शक्यता नक्कीच निर्माण होईल.


वीजचोरी करणाऱ्यांना वरदहस्त कोणत्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आहे? याचा तपास अभियंत्यांनी करुन लवकरात लवकर त्यांच्यावर निलंबनाची  कारवाई करावी.

- गणेश झगरे, मराठा सुकाणू समिती (प्रदेशाध्यक्ष)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या