ढोरजळगांव
ग्रामीण भागातील विद्यार्थांना खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वाचन संस्कृती रूजविणे काळाची गरज असुन माजी सैनिक संजय डोंगरे यांनी ग्रामीण भागातील शेतक-यांच्या मुलांसाठी यश फाऊडेंशनच्यावतीने सुरू केलेले वाचनालय निश्चित भविष्यात चांगले आधिकारी देशसेवेचे स्वप्नाची निश्चित पुर्तता करणारे होईल असे प्रतिपादन जनशक्ती मंचाचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे यांनी बोलताना व्यक्त केले.
गरडवाडी येथे संजय डोंगरे यांच्या प्रयत्नातुन व देशसेवेनंतर अपण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे देणे लागतो, हा उदात्त हेतु आत्मसात करून यश फाऊडेशनच्या वतीने वाचनालयाचे उद्घघाटनाप्रसंगी काकडे बोलत होते.
यावेळी चेअरपर्सन फॉमिली वेलफेअर आर्गनायझेन अर्मडकोर,सेंटर अँड स्कुल अहमदनगर येथील अंजना झॉ,व आर्मी फॉमिली वेलफेअर टिम अ.नगर, हभप गणेश महाराज डोंगरे,सरपंच रागिनी लांडे,बबनराव भुसारी,आंंबादास कळमकर,सुधाकर लांडे,राजेंद्र देशमुख,भगवान गरड,अँड नामदेव गरड,जयकुमार देशमुख,आशोक देवढे, भाऊसाहेब गरड, संजय केदार, गणेश गरड,राजेंद्र गरड,भिवसेन केदार,सतोंष केदार,सोमनाथ महाराज गरड,उध्दव वाघमारे, आदीसह परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काकडे पुढे म्हणाले की तालुक्यात सर्वच स्तरावर विकास झाला असे आपण म्हणत असलो तरी आपल्या तालुक्यात ग्रामीण भागात चांगले विद्यार्थाची मानसिकता ही व्यवसाय उद्योग धंद्याकडे वळवुन चांगली प्रगती साधली तर खेडे निश्चित स्वयंपुर्ण होण्यास मदत मिळेल प्रत्येकाने आपला गांव तालुका हे आपले कुंटुब आसल्याप्रमाणे भविष्यात काम केले तर खेडेगांंव स्वयंपुर्ण होण्यास वेळ लागणार नाही.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तेजस डोंगरे यांनी तर अभार संजय डोंगरे यांनी केले.
0 टिप्पण्या