... तर पवारांनी अधिक चांगले काम केले असते : फडणवीस


पुणे

चाळीस वर्षांनंतर मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. पवार साहेब मोठे नेते आहेत. पण ते कधीच सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाहीत. राहिले असते तर बरं झालं असतं. त्यांनी चांगलंच काम केलं असतं. पण त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना कधी अडीच वर्षे, कधी दीड वर्षे असं मुख्यमंत्रिपदावर राहावं लागलं. पण एका गोष्टीचं मला समाधान आहे की, मी विरोधी पक्षनेता म्हणूनही समाधानी आहे, हे पाहून आख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ झाली आहे. हीच माझ्या कामाची पावती आहे, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. 'मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं', या फडणवीसांच्या वक्तव्यावर 'जखम किती खोलवर आहे, हे त्यांच्या वक्तव्यातून दिसते' अशी खोचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. 

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले, 'मी चार वर्ष मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे, हे मी कबूल करतो. पाच वर्ष सत्तेत असल्याचे स्मरण राहणं हे कधीही चांगलं. वेदना किती खोल आहे हे यातून दिसतं, पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. सत्ता येते जाते, याचा फारसा विचार करायचा नसतो', असा सल्लाही पवार यांनी फडणवीसांना दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या