सुरत
गुजरातमधील सुरतच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स पाठवले असून मोदी आडनावासंदर्भातील वक्तव्याविरुद्ध दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यासंबंधी २९ ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. एप्रिल २०१९ला राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून वक्तव्य केले होते. या प्रकरणात न्यायालयात खटला सुरू आहे.
मोदी आडनावावरून राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महानगर दंडाधिकारी ए. एन. दवे यांनी राहुल गांधींना समन्स बजावून २९ ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, गेल्या २४ जून रोजी राहुल गांधी न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी त्यांनी आपण केलेले वक्तव्य वादग्रस्त नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे कोणाचा अपमान होत नसल्याचेही म्हटले होते. आता या प्रकरणात २९ सप्टेंबरला त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्या दिवशी दुपारी ३ ते सायंकाळी ६ दरम्यान सुनावणी होण्याची शक्यता आहे.
0 टिप्पण्या