बारामती
बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री करणार्यावर माळेगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी मनोज जाधव यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत झेलसिंग रोड माळेगाव येथे अवैधरित्या दारू विक्री करत असल्याची गोपीनीय माहिती माळेगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली . त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांच्या सोबत पोलीस हवालदार वाघ, पोलीस शिपाई प्रशांत राऊत, दीपक दराडे यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून टाकत मनोज जाधव यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणी त्याच्या जवळ असलेली १ हजार ८०० रुपये किमतीची तयार हातभट्टीची दारु जागीच नष्ट करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या