घरोघरी जाऊन लसीकरण


शिंगवे पारगाव

शिंगवे (ता .आंबेगाव ) येथे निरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत शिंगवे येथे वाडी वस्तीवर जाऊन कोरोना लसीकरण करण्यात आले.

आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात आरोग्य विभागा अंतर्गत शिंगवे येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून निरगुडसर आरोग्य विभागाअंतर्गत शिंगवे येथे आरोग्य अधिकारी सोमनाथ शिंदे, आरोग्य सहायक व्ही.व्ही.जोशी, ओरोग्य सेविका पी.बी. गुरव तसेच आशा वर्कर वैशाली साळी ,सुरेखा गाढवे व साधना हाटकर यांनी लसीकरण करून घेतले. गावातील वाडीवस्तीवर जाऊन लसीकरणा पासुन वंचित राहीलेल्यांचे लसीकरण केले. एकही लसीकरण न घेतलेल्या नागरिकांना शिंगवे गावातील गाढवे मळा येथे घरोघरी जाऊन  लसीकरण करण्यात आले.

यावेळी सरपंच सिता पवार, उपसरपंच संतोष नामदेव वाव्हळ, ग्रामपंचायत सदस्य नविना गाढवे, समर्थ पंडीत, ग्रामपंचायत कर्मचारी अक्षय वाव्हळ, माऊली वाव्हळ, संतोष वाव्हळ, गणेश टाके, कोंडीभाऊ गाढवे आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या