अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

अमेरिकेचे डेव्हिड कार्ड, जोशुआ डी एंग्रिस्ट आणि गुइडो डब्ल्यू इम्बेन्स सन्मानित


स्टॉकहोम

यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाले आहे. हा पुरस्कार डेव्हिड कार्ड आणि संयुक्तपणे जोशुआ डी.एंग्रिस्ट आणि गुइडो डब्ल्यू इम्बेन्स यांना दिला गेला आहे. द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सच्या मते, डेव्हिड कार्ड यांना लेबर इकॉनॉमिक्समध्ये योगदानासाठी आणि जोशुआ डी. एंग्रिस्ट-गुइडो डब्ल्यू इम्बेन्स यांना कॅज्यूअल रिलेशनशिपच्या अॅनालिसिससाठी हा अवॉर्ड देण्यात आला आहे. तिन्ही अर्थशास्त्राज्ञ हे अमेरिकेतील रहिवासी आहेत.

स्वीडिश अकादमीने एका निवेदनात म्हटले आहे की, या वर्षीचे पुरस्कार विजेते डेव्हिड कार्ड, जोशुआ एंग्रिस्ट आणि गुइडो इम्बेन्स यांनी आम्हाला बाजाराबद्दल नवीन अंतर्दृष्टी दिली आहे आणि नैसर्गिक प्रयोगांमधून कोणती कारणे आणि परिणामांविषयी निष्कर्ष काढता येतील याविषयी दाखवले आहे. त्याचा दृष्टिकोन इतर क्षेत्रात पसरला आहे आणि अनुभवजन्य संशोधनात क्रांती झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या