शिक्षक भारतीच्या उपाध्यक्षपदी कल्याण रुईकर


शेवगाव

शेवगाव तालुका शिक्षक भारतीच्या उपाध्यक्ष पदी भगवान बाबा विद्यालय वाडगाव येथील कल्याण रुईकर तर सहसचिव म्हणून दहेश्वर माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले सोमनाथ रेवडकर यांची निवड करण्यात आली. शिक्षक भारतीचे महाराष्ट्र राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, उच्च माध्य अध्यक्ष जितेंद्र आरु, जिल्हा कार्यवाह व नेवासा तालुका अध्यक्ष संजय भुसारी , पाथर्डी तालुकाध्यक्ष शेंदूरकर यांचे हस्ते नियुक्ती पत्र वितरित करण्यात आली. यावेळी कार्यकारिणीत समावेश केलेले नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकारी पुढील प्रमाणे निवृत्ती झाडे प्रसिद्धिप्रामुख प्रवीण भराट प्रसिद्धिप्रामुख, विषवनाथ सोनावणे संघटक,विजय हुसळे,संजय शिंदे सल्लागार , मोहिटे बाबासाहेब,  सल्लागार बाळासाहेब सुसे, गणेश मुंगसे कार्यकरिणी सुधाकर उगले, सय्यद अमजद, शंतनू कांबळे ,बबन गायकवाड, विकास भराट यांची नव्याने निवड करण्यात आली.  निवडीबद्दल जिल्हाअध्यक्ष आपासाहेब जगताप,राज्य सचिव सुनील गाडगे, जितेंद्र आरु,जिल्हा कार्यवाह संजय भुसारी, उपाध्यक्ष सिकंदर शेख सचिव महेश पाडेकर, तालुकाध्यक्ष कैलास जाधव, नानासाहेब काटे,  मुकुंद अंचवले, गणेश दसपुते, घुगे अर्जुन, अशोक उगलमूगले आदींनी अभिनंदन केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या