चमोली
लग्नासाठी इतर धर्मांमध्ये धर्मांतर करणारे हिंदू मोठी चूक करत असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. हिंदू कुटुंब आपल्या मुलांना धर्माचा अभिमान बाळगण्यासंबंधी, परंपरा आणि मूल्यांचे शिक्षण देत नसल्यामुळे हे घडत असल्याचे ते म्हणाले. मोहन भागवत उत्तराखंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
भागवत म्हणाले, की धर्मातर कसे काय होते ? आपल्या देशातील मुलं, मुली इतर धर्मात कसे काय जातात? छोट्या छोट्या स्वार्थांसाठी, लग्न करण्यासाठी. असे करणारे चुकीचे आहेत हा मुद्दा वेगळा आहे. पण आपणच आपल्या मुलांमध्ये स्वतःची संस्कृती, परंपरा, धर्म याच्याविषयी अभिमान जागरूक ठेवण्यात कमी पडतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मोहन भागवत यांनी यावेळी पालकांना आपली मुले ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय पाहतात यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहन केलं. ते म्हणाले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्व काही पाहायला मिळते. माध्यमांमध्ये जे येते ते मुलांसाठी आणि आपल्या मूल्यांच्या व्यवस्थेसाठी काय चांगले होईल या दृष्टीकोनातून नसते, असेही भागवत म्हणाले.
1 टिप्पण्या
mr. bhagwat you are talking against citizens democratic right
उत्तर द्याहटवा