महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातही सापडला कोरोनाचा नवा व्हेरियंट


मुंबई 

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात एस ए आर एस सी ओ वी 2 च्या डेल्टा प्रकारांची सबलाइनर प्रकरणे आढळून आल्यानंतर भारताचा करोना जीनोमिक सर्व्हिलन्स प्रोजेक्ट हाय अलर्टवर आहे. नॅशनल सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल कडून जारी करण्यात आलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग अहवालात इंदूरमध्ये नवीन कोविड प्रकारच्या ए वाय ४ – डेल्टा व्हेरियंटची सात प्रकरणे आढळून आली आहेत. त्यापैकी दोन महू कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असलेले लष्करी अधिकारी आहेत, असे इंदूरचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ बीएस सैत्य यांनी सांगितले आहे. सप्टेंबरमध्ये यांचे नमुने घेण्यात आले होते.

आरोग्य संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ऐ वाय ४.२ डेल्टा व्हेरिएंट सर्व प्रकरणांमध्ये सुमारे सहा टक्के आहे. डेल्टा हा व्हेरिएंट घातक आहे. ऐ वाय.४.२ नावाचा डेल्टा व्हेरिएंट हा इंग्लंडमध्ये पसरला होता,” असे अहवालात म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांत त्याची चाचणी केली केली असता, तो मुख्य डेल्टा आवृत्तीपेक्षा अधिक वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. एनसीडीसी अहवालात असे म्हटले आहे की या व्हेरिएंटमुळे सप्टेंबरमध्ये इंदौर जिल्ह्यात कोविड-१९ ची वाढ झाली होती. ऑगस्टमध्ये करोना संसर्ग ६४ टक्क्यांनी वाढला होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या