Breaking News

कृषिपूरक उद्योगातून महिला सक्षमीकरण शक्य : डॉ. कुलकर्णी


श्रीरामपूर 

महिला बचत गटांच्या माध्यमातून देशातील महिला शक्ती एकवटली. महिला सक्षमीकरणासाठी कृषी पूरक उद्योगांच्या माध्यमातून गती देता येईल, असा विश्वास आयएएस डॉ. किरण कुलकर्णी यांनी व्यक्त केला. 

राज्याचे नगर परिषद संचालनालयाचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी व उपायुक्त श्रीकांत अनारसे यांनी श्रीरामपुर येथे भेट दिली. शहरातील विविध योजनांचा आढावा घेऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. 

दरम्यान, डॉ. किरण कुलकर्णी  यांचे हस्ते कृषी विस्तार विषयक, कापूस बोंड अळी, मका लष्करी अळी, ऊस हुमणी व्यवस्थापन, फवारणी घेतानाची काळजी, कांदा पेरणी यंत्र माहिती आदी विविध माहिती पत्रिकांचे प्रसारण करण्यात आले. 

यावेळी कृषी विभागाच्या मंडळ कृषी अधिकारी अश्विनी गोडसे यांचा डॉ. किरण कुलकर्णी यांनी सत्कार केला, कार्यक्रमाचे नियोजन तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका कृषी विभागाचे सुधाकर कदम, रियाझ शेख, कृषी पर्यवेक्षक श्रीधर बेलसरे, कृषी सहायक संघटनेचे जिल्हा पदाधिकारी आदिनाथ धुमाळ, कृषी पतसंस्थेचे संचालक अनिल शेजुळ, नवनाथ डोकडे, प्रकाश दांडगे आदींनी केले.


No comments