भाजपाला दूर ठेवण्यापेक्षा काँग्रेस सत्तेत कसे येईल याकडे पहा ; सत्यजित तांबे


कर्जत 

राज्यात महाविकास आघाडी सरकार असले तरी आपल्या स्वताचा पक्ष वाढविणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची विचारमूल्ये, पक्षाची ध्येयधोरणे सर्व सामान्य जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यात प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करावे. भाजपाला दूर ठेवण्यापेक्षा आपला काँग्रेस पक्ष सत्तेत कसा येईल याकडे सर्वानी लक्ष दिले पाहिजे. असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. ते कर्जत येथे काँग्रेस आढावा बैठक प्रसंगी बोलत होते. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अड माणिक मोरे हे होते. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, तालुकाध्यक्ष किरण पाटील, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, युवकचे अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन घुले आदी पदाधिकारी आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

      यावेळी पुढे बोलताना सत्यजित तांबे म्हणाले,  २८ कोटींची पाणी योजना उभारली गेली, मात्र कर्जतची जनता आज देखील तहानलेली आहे. याचा जाब विचारण्याची ही निवडणूक आहे. आगामी काळात हे चित्र जर बदलायचे असल्यास यंदा काँग्रेसचा नगराध्यक्ष होण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक लाभार्थ्यांना साधा उतारा न मिळाल्याने त्याचा लाभ चुकला गेला.  याचा अर्थ कर्जत नगरपंचायत काय कारभार करते ? असा प्रश्न निर्माण होत आहे. आगामी काळात सर्वानी एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन घडेल असा विश्वास आपणास वाटत असल्याचे तांबे म्हणाले.  

जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले म्हणाले की, कर्जत शहर आणि तालुक्यात युवकांची ताकद काँग्रेस पक्षाच्या मागे असून आगामी काळात त्यांना पाठबळ द्यायचे आहे. शहराच्या विकासात काँग्रेसचे महत्वपूर्ण योगदान आहे. समोर बसलेले जेष्ठ व्यक्ती, मार्गदर्शक आणि कार्यकर्तेच्या जोरावर प्रवीण घुले घडला आहे. आणि हीच ताकद आपल्या मागे कायम राहिली आहे. भविष्यात याच ताकदीच्या जोरावर काँग्रेसला गतवैभव आणून देतील असा विश्वास व्यक्त केला. 

प्रास्ताविक करताना नगरसेवक सचिन घुले म्हणाले की, कर्जत-जामखेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आज सुद्धा एका आवाजाने सर्व कार्यकर्ते एकत्र येतात. त्यांना ताकद देण्याचे काम आपणांस करायचे आहे. यंदाच्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत १७ जागा स्वबळावर लढविणार असल्याचे सुतोवाच सचिन घुले यांनी आढावा बैठकीत दिले. 

यावेळी समन्वयक ज्ञानदेव वाफारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, स्मितल वाबळे, विलास निकत, संतोष मेहेत्रे आदींची भाषणे झाली. याप्रसंगी सचिव तात्यासाहेब ढेरे, बापूसाहेब काळदाते, ॲड नामदेव खरात, मुबारक मोगल, ओंकार तोटे, अमोल भगत, प्रियेस सरोदे, माजीद पठाण, रामराजे जागीरदार, राजू बागवान आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या