वैजापूर :
वैजापूर- गंगापूर विधानसभा मतदार संघातील नारळी नदी जोड प्रकल्पास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाल्यामुळे पळसगाव प्रकल्पात नारळी नदीचे पाणी वळविण्याचा
मार्ग माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या प्रयत्नाने मोकळा......
मागील अनेक वर्षापासून पळसगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे या प्रकल्पांतर्गत लगत असलेल्या नारळी नदीवर वळण बंधारा बांधून या नदीचे पाणी पळसगाव प्रकल्पात सोडावे अशी मागणी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व परिसरातील शेतकरी मागील सहा वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत होती परंतु भाजपा सरकारने या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते त्या अनुषंगाने दिनांक 12 मे 2021 रोजी जलसंपदा मंत्री मा जयंत पाटील साहेबांनी मुंबई येथे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर व शिष्टमंडळासोबत बैठक लावून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देऊन योजनेची सविस्तर अंदाजपत्रक बनवून प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर करावे असे निर्देश दिले होते 21 ऑक्टोबर 2021 रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यासाठी शिफारस केली असून येत्या मंगळवारी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळणार असून वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातील नारळी नदी जोड प्रकल्प होण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला याबद्दल लाभधारक शेतकऱ्यांनी नामदार जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब व आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचे आभार मानले आहे
या प्रकल्पामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे यामुळे शेतकरी सदन होण्यास मदत होईल या भागातील गाजगाव, खादगाव, देरडा, पळसगाव, शहापूर, घोडेगाव, कनकुरी, डोमेगाव, बोरगाव, येसगाव, आदी जवळपास दहा ते बारा गावांना याचा फायदा होणार आहे
0 टिप्पण्या