Breaking News

मढेवडगाव सोसायटीत डिव्हीडंट वाटपास प्रारंभ


लिंपणगाव 

श्रीगोंदा तालुक्यामधील प्रमुख सहकारी सोसायटी पैकी एक असणारी मढेवडगाव सोसायटीचे डिव्हीडंट वाटपाची सुरुवात आज संस्थेचे चेअरमन बापूसाहेब वाबळे, व्हॉ. चेअरमन रावसाहेब जाधव, संचालक गोरख मांडे, खंडेश्वर झिटे, काकासाहेब मांडे, सिताराम बनकर, वर्षाताई वाबळे, सुरेखा शिंदे, यांच्या उपस्थित करण्यात आली.

मढेवडगाव सोसायटीने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे 12 टक्के प्रमाणे लाभांश वाटपास सुरुवात केली. त्यामुळे दिवाळीमध्ये संस्थेच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याप्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब वाबळे यांनी संस्थेचे सभासद हे नेहमी संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या कर्ज वसुलीसाठी  मदत करतात. त्यामुळे संस्थेच्या नफ्यामध्ये वाढ होऊन आपणाला सभासदांना नफा वाटणी करण्यास मदत होते. तसेच संस्थेचा व सभासदांचा फायदा होतो. संस्थेचा धान्य विभागाला चांगला नफा असून खत विभागही चालू आहे. परंतु खाजगी दुकानांच्या स्पर्धेमुळे सभासदांनी आपल्या मालकीचे असणाऱ्या संस्थेच्या खत विभागामध्ये भविष्यामध्ये खते खरेदी करावे व आपला खत विभागाचा नफा वाढवण्यास मदत करावी, असे आवाहन संस्थेचे चेअरमन बापूसाहेब वाबळे यांनी केले आहे.

याप्रसंगी प्रमोद शिंदे, पंडित वाबळे, प्रकाश उंडे, अशोक कुरुमकर, हनुमंत झिटे, जयसिंग मांडे, कल्याण शिंदे, बापूराव मांडे, संतोष उंडे, नेमीचंद साळवे, साहेबराव उंडे विलास वाबळे आदी सभासद उपस्थित होते.


No comments