श्री समर्थ पंत महाराज (बाळेकुंद्री) यांची ११६ वी पुण्यतिथि उत्साहात साजरी ...


खेड (ता.) प्रतिनिधी 

कोरोना महामारीमुळे  गेले दोन वर्षात अनेक सार्वजनिक उत्सवांवर व कार्यक्रमांवर निर्बंध आले होते. परंतु आता या वातावरणात बदल होत चालले असल्याकारणामुळे यंदा राजगुरुनगर येथील भीमानदी तीरी श्री दत्त विश्वस्त मंडळाच्या वतीने श्री समर्थ पंत महाराज (बाळेकुंद्री) यांच्या पुण्यतिथी ऊत्सवाचे आयोजन मंडळाच्या वतीने नुकतेच करण्यात आले होते.

दर वर्षी ऑक्टोबर महिन्यात राजगुरूनगर व पंचक्रोशीतून अनेक भाविक मंडळी श्री क्षेत्र बाळेकुंद्री जे कर्नाटक व महाराष्ट्रच्या सीमेवर वसलेले आहे. अशा  ठिकाणी आवर्जून जात असतात. परंतु यंदा कर्नाटक प्रशासनाने उत्सवावर कडक निर्बंध लादल्याने निवडक लोकसंख्येत हा उत्सव श्रीक्षेत्री करण्याचे अध्यादेश काढल्याने भाविकांचा उत्साह मावळला होता. 

यंदा हा उत्सव सोहळा राजगुरूनगर येथे करण्याचे प्रयोजन रवींद्र जोशी यांनी ठरविल्याने या उत्सवाची रंगत स्थानिक भाविकांना उपभोगता आली. यावेळी सकाळी ८ वाजता आभिषेक व महापूजा यजमान चाकण नगरीचे उद्योजक अविनाश नाणेकर या उभयतांच्या हस्ते करुन उत्सवास सुरुवात झाली. दुपारी श्री दत्त विश्वस्त मंडळाचे भजन, जप, ओम नमः शिवाय नामाचा जयघोष व सायंकाळी ६.०० वाजता भक्त मंडळींच्या उपस्थितीमध्ये उत्सव साजरा करण्यात आला. तदनंतर हरी जागर, आरती व प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता झाली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या