डाळिंब शेतीशाळेत प्रगत तंत्रज्ञानचे धडे


बारामती 


कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि बारामती तालुका सहकारी फलोत्पादन संघ पिंपळी यांचे संयुक्त विद्यमाने बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत डाळींब शेतीशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शेतीशाळेस आत्माचे व्यवस्थापक विश्वजित मगर, डाळींब उत्पादक संघाचे चेअरमन वसंतराव घनवट, द्राक्ष बागायतदार संघाचे सुनिल पवार, भाऊसाहेब काटे, शहाजी जाचक व डाळींब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरीहर कौसडीकर यांनी डाळींबाच्या बहार व्यवस्थापन, छाटणी करताना  घ्यायची काळजी, सुक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन, हवामानातील  बदलानुसार बागेचे व्यवस्थापन, फळ काढणी  पुर्व नियोजन आदी याविषयी सविस्तर माहिती दिली.

'स्मार्ट' प्रकल्पांर्तगत बारामती तालुका सहकारी फलोत्पादन संघास काढणी पुर्व नियोजन, पश्च्यात तंत्रज्ञान आधारित सुविधा देण्यात येतात. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रीकुलिंग युनिट, शीतगृह, फळे निर्यात करणेसाठीच्या अद्ययावत यंत्रणा उभी करणे शक्य होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या