वाळू वाहतूक करणार्‍यांवर पोलिसांची कारवाई

२० लाख २१ हजारांचा ऐवज जप्त


प्रतिनिधी  निरगुडसर

घोडेगाव गावच्या हद्दीत घोडेगाव ते जुन्नर रोड वर सालोबामळा येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर घोडेगाव पोलिसांनी कारवाई केली असून पोलिसांनी टाटा कंपनी एक ट्रक, एक क्रेटा गाडी व 3 ब्रास वाळू मिळून 23 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतची फिर्याद घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संपत कायगुडे यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी 09वाजता, पो, ई वागज सो, पो. क ढेंगऴे , पोलीस हवालदार संपत कायगुडे हे घोडेगाव गावचे हद्दीत घोडेगाव ते जुन्नर रोडवर सालोबामऴा येथे पेट्रोलिंग करीत असताना पो. स. ई वागज, यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिऴाली कि, एक व्यक्ती त्यांचे हुंडाई कंपनीची, पांढरे रंगाची क्रेटा गाडी MH.14, HQ.5232 यामध्ये बसुन वाऴु भरलेल्या ट्रकचे समोर टेहऴणी करुन रेकी करत त्याचा टाटा कंपनीच्या पांढरे रंगाचे ट्रक क्रमांक MH 14,HG.5232 यामध्ये वाऴु भरुन वाऴुची अवैध  वाहतुक करत आहे. अशी माहीती मिऴाली. त्यानंतर वरील पोलीस पथकाने रस्त्यावर नाकाबंदी लावली असता त्यावेऴी  एक इसम  त्याचे ताब्यातील  हुंडाई कंपनीची, पांढरे रंगाची क्रेटा गाडी MH 14 HQ 5232 यामध्ये बसुन आला त्यावेऴी पोलिसानी त्याला थांबवुन त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव किरण गुलाब पोखरकर,( रा. पोखरकरवाडी, पिंपऴगाव घोडे ता. आंबेगाव जि. पुणे ) असे सांगीतले.  त्यानंतर थोड्याच वेऴात तेथे एक टाटा कंपनीचा पांढरे व राखाडी रंगाचा ट्रक येताना दिसला सदर ट्रक पोलिसांनी थांबवुन त्याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता राधु बारकु दुधवडे, ( वय 30वर्षे, रा. कऴवतणीची वाडी, वावरथ, ता. राहुरी जि. अहमदनगर ) असे असल्याचे सांगीतले, सदर गाडीचा पाहणी केली असता ट्रकचा नंबर MH14 HG 5232असा होता. व ट्रक वाऴुने भरलेला होता. व त्या बाबत गाडी मालक किरण पोखरकर व चालक राधु दुधवडे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना न्हवता. या बाबत पोलिसांनी 13, 00, 000 रु. किंमतीचा एक पांढरे रंगाचा ट्रक,  21,000 रु  एकुण किंमतीची 3 ब्रास वाळु व 10, 00, 000 रु. किंमतीची एक हुंडाई कंपनीची, पांढरे रंगाची क्रेटा गाडी असा एकुन 23,21,000 रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.पोलिसानी गाडी चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या