दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

49 हजारांचा मुद्देमाल जप्त; तीन गुन्हे उघडकीस; श्रीगोंदा पोलीसांची कारवाई


लिंपणगाव

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद करून त्यांच्याकडून पूर्वीच्या तीन गुन्ह्यातील ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. श्रीगोंद्यासह नेवासा व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली. 

पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिलेल्या माहितीनुसार परमेश्वर उर्फ परमेश वैयशा भोसले (वय 25 वर्षे, रा. भेंडाळा ता. गंगापुर जि. औरंगाबाद), सचिन अशोक जाधव (वय 24 वर्षे रा. प्रवरासंगम ता. नेवास जि. अहमदनगर), महेश रामकिसन धोत्रे (वय 21 वर्षे रा. प्रवरासंगम ता. नेवासा जि. अहमदनगर) , राजु शिवाजी जाधव (वय 27 वर्षे रा. भेंडाळा ता. गंगापुर जि. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

16 जुलै 2021 रोजी सीएनजी पाईपलाईनच्या कामाचे साहित्य चोरीस गेले होते. याप्रकरणी दिनेश सदानंद पडवळे (रा. रोहा जि. रायगड ह. रा. घारगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हाही दाखल झाला होता. यासह इतर तीन गुन्ह्याची कबुली आरोपींची दिली आहे. त्यांच्याकडून चार हजारांचे तांबे, ३० हजारांची शेती अवजारे, चाळीसगाव येथील गुन्ह्यातील 15 हजार रुपयांचे २५ किलो 25 किलो तांबे हस्तगत केले आहे. त्याचबरोबर नेवासा पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांचेकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गोकुळ इंगवले हे करीत आहेत. पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सपोनि दिलीप तेजनकर, सफो अंकुश ढवळे, पोना गोकुळ इंगवले, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ दादा टाके, पोकॉ अमोल कोतकर, पोकॉ प्रशांत राठोड यांनी ही कारवाई केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या