लहान मुलांच्या कोरोना लसीबाबत अजूनही असमंजस


नवी दिल्ली

लहान मुलांसाठीच्या लसीसाठी देशाला अजून वाट पाहावी लागणार आहे. सकाळी बातमी आली की, केंद्र सरकारने एजन्सी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने 2 ते 18 वर्षे वयाच्या मुलांच्या लसीकरणासाठी स्वदेशी कोव्हॅक्सीनला मंजूरी दिली आहे. मात्र, नंतर स्वत: आरोग्य राज्यमंत्र्यांनी याचा इन्कार केला.

लहान मुलांच्या कोरोना व्हॅक्सीनवर केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती प्रवीण पवार म्हणाल्या की, अजून यावर काम सुरु आहे. मला वाटते की, काही तरी गोंधळ झाला आहे. अजून DCGI ची मंजूरी मिळालेली नाही. विशेषज्ञ निर्णय घेतली त्यानंतर लस येईल. प्रक्रिया सुरू आहे आणि आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही.

अंतिम मंजुरीवर शिक्कामोर्तब नाही

DCGI च्या विषय तज्ज्ञ समितीने तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानंतर 12 मे रोजी मुलांवर कोव्हॅक्सिनच्या चाचणीची शिफारस केली होती. हे लक्षात घेऊन DCGI ने चाचणीला मंजुरी दिली होती. भारत बायोटेकने जूनमध्ये मुलांवर कोवाक्सिनच्या चाचण्या सुरू केल्या. मात्र, त्याची अंतिम मंजुरी अद्याप बाकी आहे. जगातील विविध देशांमध्ये अशाच चाचण्यांनंतर, ही लस लहान मुलांसाठी मंजूर करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या