समस्यांमुळे स्थानिक हैराण

नगरपरिषदेने लवकरच मार्ग काढावा


आळंदी 

परिसरातील पद्मावती रस्त्यावरील स्थानिक रहिवाश्यांना अनेक मुलभुत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील ८० टक्के नागरिकांचे मतदान आळंदी नगरपरिषदेला होत असते. परंतु हद्दीच्या प्रश्नामुळे येथील नागरिकांना पाणी, कचरा, रस्ता आणि वीज या समस्यांमुळे हैराण झाले आहे, आळंदी नगरपरिषद आपली हद्द नसल्यामुळे या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आळंदी नगरपरिषदेने लवकरच पद्मावती रस्ता हद्द प्रश्नी मार्ग काढावा अशी मागणी अविरत फौंडेशनच्या वतीने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्या कडे केली आहे.

पावसाळ्यातच काय इतर वेळी ही पद्मावती रस्त्यावरून जाताना येथील स्थानिक नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, पाणी,वीज आणि कचरा हे सुद्धा प्रश्न सुटण्यासाठी नागरिकांनी संघर्ष करावा लागत आहे. फक्त मतदानापुरते येथील नागरिकांना न पाहता येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरपरिषदेने लवकरच पद्मावती रस्ता हद्द प्रश्न मार्गी काढावा अशी मागणी अविरत फाउंडेशनचे अध्यक्ष निसार सय्यद यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या