बारामती
पेट्रोलिंग करत असताना बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोधपथकाने जबरी चोरी करणाऱ्या चोरट्याला गजाआड करत त्याच्याकडून युनिकॉर्न मोटार सायकल हस्तगत केली आहे .या प्रकरणी निलेश गणेश गोरे (वय २२ वर्षे) (रा. खंडोबानगर बारामती जि. पुणे) असे ताब्यात घेण्यात आल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहर पोलीस स्टेशन हद्यीमध्ये सोन साखळी चोरीवर आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी बारामती शहर गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथक बारामती शहरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना माळावरची देवी ते जळोची कडे जाणारे रोडवर अंधारात एक इसम एका मोटजर सायकलसह संशयीतरित्या फिरत असल्याचे दिसून आले.
दरम्यान सदर इसमास जागीच पकडून त्याची चौकशी विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याची अधिक विचारपूस चौकशी केली असता त्याने त्याचे नांव निलेश गणेश गोरे (वय २२ वर्षे) (रा. खंडोबानगर बारामती जि. पुणे) असे सांगितले आहे.
त्याचेकडे मिळून आलेला सॅमसंग कंपनीचा जे ७ मोबाईल हॅन्डसेट मिळून आला. सदर मोबाईल हॅन्डसेट हा बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५९७/२०२१ भा.दं.वि.क. ३९२ मधील असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असून सदर इसमाकडे मिळून आलेली युनिकॉर्न मोटार सायकल ही इंदापूर पोलीस स्टेशन असून त्याने ती इंदापूर येथून चोरुन आणल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे
प्रकटीकरण शाखेचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके व पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक कोळेकर, पोलीस कॉन्स्टेबल राऊत , पोलीस कॉन्स्टेबल कोकणे, पोलीस कॉन्स्टेबल पवार, पोलीस कॉन्स्टेबल कोठे, इंगोले यांनी केली. सध्या दिवाळी सण असल्याने सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी केले आहे.
0 टिप्पण्या