नाईक यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहकार पुरस्कारासाठी निवड


लिंपणगाव प्रतिनिधी 

सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांची सहकार पुरस्कारासाठी निवड झाली आहे.  दिनांक २८ व २९ ऑक्टोंबर २०२१ रोजी मुंबई सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत राज्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्या, सहकारी साखर कारखाने या सहकारी संस्थांमध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्या निवडीमध्ये सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांचा समावेश आहे. दरम्यान  कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी गेल्या सहा वर्षापासून नागवडे कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करत असताना उत्कृष्टपणे प्रशासन सांभाळले आहे. त्यांच्या या साखर कारखान्यातील उत्कृष्ट कामगिरीने व अनुभवाच्या जोरावर नागवडे कारखान्याचे प्रशासन गतिमान व ऊस उत्पादक सभासदांच्या विश्वासास पात्र ठरले आहे . विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे या कारखान्याचा कोजन प्रकल्प तसेच डिस्टिलरी प्रकल्पाला संजीवनी मिळाली आहे.

त्यांच्या या  सहकार क्षेत्रातील पुरस्काराने निश्चितच नगर जिल्ह्यातील या सहकार महर्षी नागवडे कारखान्याची मान आणखी उंचावली गेली आहे. यापूर्वी  रमाकांत नाईक यांनी भवानीनगर साखर कारखान्यात देखील कार्यकारी संचालक पदावर उत्कृष्ट असे प्रशासन सांभाळले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, उपाध्यक्ष युवराज चितळकर, जिल्हा बँकेच्या संचालिका तथा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या मा सभापती अनुराधा नागवडे तसेच संचालक मंडळासह सभासद व ऊस उत्पादकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या