पीएमपीएलच्या ताफ्यात लवकरच ई बस


पुणे 

पीएमपीएमएलच्या ताफ्यात आणखी 350 नवीन ई बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलच्या ई बसेसची संख्या 500 वर पोहोचणार आहे. दरम्यान, ई बसच्या चार्जिंगसाठी पुणे महापालिकेच्या हद्दीतील 4 आणि पिंपरी चिंचवडच्या हद्दीत 3 ठिकाणी चार्जींग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतुकीची मुख्य जबाबदारी असलेल्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात सध्या 150 ई बसेस आहेत. डिझेल व सीएनजीची दरवाढ होत असताना स्वस्त इंधन आणि देखभाल दुरूस्तीचा खर्च तुलनेने कमी असलेल्या पर्यावरणपूरक ई बसेस किफायतशीर ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरच 350 ई बसेस टप्प्याटप्प्याने पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार आहेत. या बससाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 7 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. यासाठी येणार्‍या खर्चापोटी पुणे महापालिकेच्या हिश्श्याचे 30 कोटी रुपये पीएमपीएमएल प्रशासनाने महापालिकेकडे मागणी केल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या