काँग्रेसच भाजप आणि मोदींचे प्रचारक

ममता बॅनर्जींचे टीका; गोवा फॉरवर्ड पक्षासोबत आघाडी 


पणजी

काँग्रेसमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप इतकी शक्तीशाली होऊ शकली. काँग्रेसच भाजपसाठी प्रचारक म्हणून काम करत आहे, असं वक्तव्य करत तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका बाणात दोन राष्ट्रीय पक्षांवर निशाणा साधला. 

सध्या, ममता बॅनर्जी गोवा दऱ्यावर आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींनी प्रचाराला सुरूवात केली. या दरम्यान, विजय सरदेसाई यांचा पक्ष 'गोवा फॉरवर्ड पक्षा'सोबत युतीची घोषणीही ममता बॅनर्जी यांनी केली. सरदेसाई आतापर्यंत भाजप सरकारसोबत राहिले आहेत. 

काँग्रेससोबत कोणत्याही निवडणुकीत हातमिळवणी करण्याची शक्यता यावेळी ममता बॅनर्जी यांनी फेटाळली. 'विरोधी पक्षांना एकत्रित करण्याची गरज लक्षात घेण्यात काँग्रेस पक्ष अपयशी ठरला', असे  सांगताना 'भाजपचा सामना करण्यासाठी सर्व स्थानिक पक्षांना एकत्रित येण्याची गरज' त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या संविधानाचा पाया मजबूत करण्यासाठी हे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

मोदीजी दिवसेंदिवस शक्तीशाली होत चालले आहेत आणि याचे कारण काँग्रेस आहे. काँग्रेस भाजपसाठी टेलिव्हिजन रेटिंग्ज पक्ष बनला. जर त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही तर त्याचा फटका देशाला बसेल. परंतु, देशाने हे सहन का करावं? देशाकडे पुरेशा संधी आणि पर्याय आहेत, असेही यावेळी ममतां यांनी म्हटले आहे. 


'काँग्रेसने गमावली अन् तृणमूलने संधी साधली'

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने तृणमूल सोबत गाठ बांधण्याची संधी गमावली. त्यांनी डावे आणि इंडियन सेक्युलर फ्रंटसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलचे नामोनिशाण उरणार नाही केवळ महाआघाडी राहील, असे त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले होते, 'तो' अंदाज चुकीचा ठरला. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांना एकही जागा मिळू शकली नाही. आता गोवा विधानसभा निवडणुकीत गोव्यात गोवा फॉरवर्ड पक्षासोबत आघाडी करण्यास काँग्रेसने नकार दिला. त्यानंतर विजय सरदेसाई यांनी तृणमूलशी हातमिळवणी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या