अवैध सुगंधी तंबाखू साठ्यावर कारवाई

 100 किलो माल जप्त                                                                       


नगर प्रतिनिधि

शहरांमध्ये तीन ठिकाणी सुगंधी तंबाखू साठयावर पोलिसांचा छापेमारी करून कोतवाली पोलीसांनी मोठी कामगिरी केली आहे. या छाप्यामध्ये 100 किलोचा सुगंधी तंबाखू साठा जप्त करून अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने तिन्ही आरोपींना दि.१८ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक  मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, प्रभारी नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे  पोनि. संपतराव शिंदे यांच्या सूचनेनुसार अहमदनगरला  पोसई जी.टी. इंगळे, पोसई मनोज महाजन, पोना शाहीद शेख, पोना विष्णु भागवत, पोना अभय कदम, पोना शरद गायकवाड, पोकॉ सुमित गवळी, पोकाॅ सुशिल वाघेला, पोकाॅ प्रमोद लहारे, पोकाॅ काजळे, पोकाॅ खताडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

दि. १५ ऑक्टोबरला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास  पोनि संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली.  अहमदनगर शहरात कोतवाली पोलीस ठाणे  हद्दीत गोंधळेगल्ली, माळीवाडा बुरुडगाव रोड भोसले मंगल कार्यालयजवळ व जिपीओ चौक ते धरतीचौक परिसरात मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू मावा बनविण्यासाठी साठवून ठेवली जाते, तसेच त्या ठिकाणाहून वाहतूक करणे सुरू आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीनुसार पोनि श्री शिंदे यांनी  कोतवाली पोलिसांचे पथके तयार करून पथकांना सूचना दिल्या. पंचासमक्ष तिन्ही ठिकाणी छापेमारी करण्यात आली. नगर शहरातील  गोधंळेगल्ली (माळीवाडा अहमदनगर) येथे छापा टाकण्यात आला. येथे   संतोष प्रकाश सोनवणे (वय ३४, रा सर्जेपुरा अहमदनगर) याला ताब्यात  घेऊन त्याच्याकडून  १ लाख ८० हजार  रु किंमतीचे एकूण १०० किलो सुगंधी तंबाखु १० गोणीमध्ये सोनेरी रंगाचे प्लॉस्टीक मध्ये प्रत्येकी१० किलो वजनाच्या.  बुरुडगाव रोड भोसले मंगलकार्यालयाजवळ  सफल संतोष जैन (वय ३५, रा मोतीनगर केडगाव अहमदनगर) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून लाख  २४ हजार ५०० किंमतीचे एकूण ७० पुटयाचे छोटे बॉक्स. त्यामध्ये सुगंधी तंबाखु प्रत्येकी ३५० रु दराची आणि  धरतीचौक ते जिल्हाधिकारी कार्यालय रोडवर पॅगो माल वाहतूक टेम्पो ( एमएच १६ ए ई ९६७) यामध्ये  गोरक्षनाथ मच्छींद्र धाडगे (वय ३६, चालक रा बु·हाणनगर भिंगार अहमदनगर) याल ताब्यात घेऊन त्याच्याकडून ९६ हजार २५० रु.किंचे त्यामध्ये एकूण ७ पोत्यामध्ये सिल्व्हर रंगाच्या प्लॅस्टीक मध्ये प्रत्येकी ५०० ग्रॅम वजनाचे ३८५ पॅकेट प्रत्येकी किंमत २५० रुपये दराचे,  ७० हजार  रु लाल रंगाची पॅगोरिक्षा टेम्पो (एमएच १६ ए ई ९६७) असा असलेली एकूण १ लाख ६६ हजार २५० रु.चा कायदेशीर कारवाई करुन एकूण ३ लाख ७० हजार ७५० रुपये किंचा मुददेमाल आरोपीसह ताब्यात घेण्यात आले. या आरोपींवर  कोतवाली पोलीस ठाण्यात अनुक्रमे  कोतवाली पोस्टे  गुन्हे दाखल करून आरोपी अटक करण्यात आली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या