बारामती
आपल्या देशातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर व नर्स तसेच सामाजिक क्षेत्रातील संस्था व प्रत्येकानेच आपल्या जिवाची पर्वा न करता सातत्याने कोरोनाकाळात कार्यरत राहिल्यामुळे आपल्या देशात मुत्युदर कमी राहिला व आपण आज कोरोनाशी लढण्यात यशस्वी होतोय. आज प्रत्येकानेच सामाजिक कार्यात पुढे आले पाहिजे आज मला आनंद आहे की यादगार सोशल फाऊंडेशन,सामाजिक कार्यात नेहमीच कटिबद्ध व अग्रेसर आहे व यापुढेही राहिल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
यादगार सोशल फाऊंडेशन व इन्लॅक बुधरानी हॉस्पिटल,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (दि:२३) रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन तसेच यादगार सोशल फाऊंडेशन च्या वतीने प्रभाग क्रमांक १६ मधील जेष्ठ नागरिकांना डोळे तपासून मोफत चष्मे वाटप कार्यक्रम खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी बोलताना पवार म्हणाले यादगार सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी.फिरोजभाई अजिजभाई बागवान व इन्लॅक बुधरानी हाॅस्पिटल यांनी आयोजित केलेल्या मोफत मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन शिबिराचे कार्य हे कौतुकास्पद आहे.
सदर कार्यक्रमाकरीता संपुर्ण बारामती तालुक्यातून जवळ जवळ २६८ च्या वर मोतिबिंदू असणारे रुग्ण व यादगार सोशल फाऊंडेशनच्या वतीने ७५२ नागरीकांची डोळे तपासणी करून चष्मे मोफत देण्यात आले व त्याचबरोबर बारामती शहरामध्ये कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीत जनसेवा केलेल्या ८ कोरोना योध्दा मंडळ यांचाही सत्कार खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, नगराध्यक्ष सदाशिव सातव, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर, गटनेते सचिन सातव, जेष्ठ विधिज्ञ अॅड. ए.व्ही. प्रभुणे, डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. राजेश कोकरे, नगरसेविका डॉ. सुहासिनी सातव, कमल कोकरे, नगरसेवक जयसिंग देशमुख , सुनिल सस्ते, विष्णुपंत चौधर, माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील, अनिल कदम, सिध्दनाथ भोकरे, निलेश इंगुले इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाकरीता माजी नगरसेवक अजीजभाई बागवान व विद्यमान नगरसेविका बेबीमरियम बागवान यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता फिरोज अजीजभाई बागवान, माजी नगरसेवक अमजद अजीजभाई बागवान व यादगार सोशल फाऊंडेशनचे सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या