इंदापूर प्रतिनिधी
गेल्या कित्येक महिन्यांपासून सतत इंधन दरवाढ होत आहे.त्यामुळे लाखो रुपयांचे कर्ज काढून जेसीबीमध्ये गुंतवणूक केलेल्या व्यवसायिकांना इंधन दरवाढीचा फटका बसत असल्याने शासनाचा निषेध व्यक्त करत एक दिवस काम बंद आंदोलन जेसीबी धारकांकडून करण्यात आले.सध्या जेसीबी धारकांना तासी १ हजार रुपये भाडे मिळत आहे.परंतु १ नोव्हेंबर पासून प्रति तास दोनशे रुपये वाढ करून बाराशे रुपये आकारण्यात येणार असल्याचा निर्णय इंदापूर अर्थमूव्हर्स युनियनने घेतला आहे.
यावेळी सागर चव्हाण,अमोल चोपडे,राहुल वाघमोडे,सचिन ठावरे,महेश पवार,अशोक जाधव,महेश जाधव,नाना सागर,विजय जाधव,शुभम दिवसे,आदित्य चौगुले,श्री.जगताप आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या