कवठे येमाई
शिरूर तालुक्यातील मुंजाळवाडी येथील बापूसाहेब गावडे विविध सहकारी सोसायटीने सन २०२१ - २२ ची ६ महिन्यांपूर्वीच १०० टक्के कर्ज वसुली केली असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सभासदांना ८ टक्के लाभांशचे आज शनिवार दि. ३० ला वाटप करण्यात आल्याची माहिती सोसायटीचे उपाध्यक्ष संतोष मुंजाळ,सचिव अर्जुन शिंदे यांनी दिली.
आज येथील सोसायटी कार्यालयात झालेल्या लाभांश वाटप प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष साहेबराव मुंजाळ उपाध्यक्ष संतोष मुंजाळ, संचालक गजानन मुंजाळ, माजी अध्यक्ष, संचालक धोंडिभाऊ हिलाळ, केशव हिलाळ, समिंद्राबाई मुंजाळ, डॉ.हेमंत पवार, केरभाऊ मुंजाळ, संदीप मुंजाळ व इतर संचालक, सभासद उपस्थित होते.
सतत २ वर्षे १०० टक्के कर्जवसुली होत असलेल्या मुंजाळवाडी येथील बापूसाहेब गावडे विविध सहकारी सोसायटीचे ४२७ सभासद असून २ कोटी ०४ लाख रुपयांचे मागील हंगामात पीककर्ज वाटप करण्यात आले होते. सतत २ वर्ष सभासदांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे या सोसायटीची १०० टक्के वसुली होत आहे. यात संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष,सचिव व संचालक मंडळ ही सभासदांना जाणवणाऱ्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे काम करीत आहेत. या सोसायटीने सतत २ वर्षे १०० टक्के वसुली करून सभासदांना लाभांशाचे वाटप केल्याबाबद्दल माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका डॉ.वर्षा शिवले, सामाजिक कार्यकर्ते विलास रोहिले यांनी संचालक मंडळ, सभासदांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या