नवी दिल्ली
देशात रविवार पुन्हा एकदा सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढवले आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझलचे दर कधी कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी मात्र, तेलाच्या किंमतीमध्ये कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवल्यानंतर रविवारी दिल्लीत डिझेल आणि पेट्रोल या दोन्हीच्या किमतीत 35 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये लोकांना आता एक लिटर पेट्रोलसाठी 105.84 रुपये आणि डिझेलसाठी 94.57 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर एक लीटर पेट्रोल 111.77 रुपयांना आणि एक लिटर डिझेल 102.52 रुपयांना विकल्या जात आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे कोलकातामध्ये पेट्रोल 106.43 रुपये आणि डिझेल 97.68 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये डिझेल 98.92 रुपये आणि पेट्रोल 103.01 दराने विकले जात आहे.
0 टिप्पण्या