Breaking News

लखीमपूर निषेधार्थ कँडल मार्च


खेड (ता.) प्रतिनिधी । प्रभाकर जाधव
 

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये शेतकरी मोर्चात केंद्रीय राज्यमंत्र्याच्या मुलाने मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून  ७ शेतकऱ्यांना चिरडले. या घटनेचा निषेध म्हणून रात्रौ ८ वाजता खेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राजगुरूनगर येथील पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कँडल मार्च मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

राजगुरूनगर शहरातून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य कैलास सांडभोर, राजगुरूनगर शहराध्यक्ष सुभाष होले, उपाध्यक्ष प्रभाकर जाधव, शिवसेना माजी तालुकाप्रमुख गणेश सांडभोर, माजी सभापती अरुण चांभारे, शांताराम चव्हाण, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मनीषा सांडभोर, वैभव घुमटकर, वैभव नाईकरे, किरण थिगळे, बबनराव शिवले आदींनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले.


No comments