गडीत उभारणार ऐतिहासिक म्युझियम

६ कोटींचा निधी मंजूर


जामखेड 

गडी येथे ऐतिहासिक म्युझियम उभारले जाणार असून त्यासाठी ६ कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. अशी माहिती कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी दिली. रोहित पवार हे तालुक्यातील खर्डा शहरातील सोसायटीचे कै. नितीन वेणुनाथ गोलेकर खर्डा वि.वि.का. सेवा संस्थेच्या दोन मजली इमारतीचा अनावरण सोहळ्यासाठी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 

अनावरण सोहळा आ रोहित पवार, राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय वारे ,मधुकर आबा राळेभात, चंद्रकांत राळेभात, जयश्री गोलेकर, सूर्यकांत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी बोलताना आ रोहित पवार म्हणाले ,की  ही संस्था नितिन गोलेकर यांचे आजोबा गजानन बाबाजी गोलेकर यांनी १९२९ साली स्थापन केली आहे.  संस्थेमध्ये संचालकांमध्ये मतभेद असले तरी विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येऊन विकासाचे राजकारण करावे असे पवार यांनी आवाहन केले. 

तसेच जुनी निंबाळकर  गडी येथे ऐतिहासिक म्युझियम उभारले जाणार असून त्यासाठी ६ कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. तसेच बारा ज्योतिर्लिंग , सिताराम बाबा,  संत गीते बाबा देवस्थान वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटन विकास आराखड्यात समावेश झालेला आहे. त्यामुळे खर्डा नावारूपाला येत आहे. तसेच शेतकर्‍यांना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत शासनाने जाहीर केली होती. परंतु कोरोना काळामुळे ही मदत शेतकऱ्यांना देण्यास उशीर झाला. तरी लवकरच त्याची पूर्तता होणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले . पूर्वी खर्ड्याची ओळख वेगळ्या पद्धतीने होत होती ती ओळख पुसून स्वराज्य  ध्वजाच्या  निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला आगळीवेगळी ओळख व वैभव प्राप्त करून देण्याचे काम केले आहे. याचे मला भाग्य वाटते, असे पवार यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांसाठी  ३००० मेट्रिक टन क्षमतेचे वखार गोडाऊन मार्केट यार्ड खर्डा येथे होत आहे. त्याचा या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यावेळी  मधुकर आबा राळेभात, दत्तात्रय वारे ,चंद्रकांत राळेभात, सुनील लोंढे, मंजीर सय्यद , जयश्री नितीन गोलेकर ,सरपंच आसाराम गोपाळघरे, चंद्रकांत गोलेकर चेअरमन , व्हा. चेअरमन श्रीकांत लोखंडे, सूर्यकांत नाना मोरे इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले ,यावेळी आमदार रोहित पवार यांचा सत्कार संस्थे चेअरमन चंद्रकांत गोलेकर, व्हा.चेअरमनश्रीकांत लोखंडे व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत लोखंडे यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या