श्रीगोंदा
प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंती निमित्त मंगळवार दिनांक १९ ऑक्टोंबर २०२१ रोजी डॉ. इमरान जमादार यांच्या आनंद हॉस्पिटल येथे सकाळी १० ते ४ या वेळेत श्रीगोंदा तालुका मुस्लीम जमात, सहयोग फौंडेशन व रोटरी रक्तपेढी, दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या कोविड -१९ मुळे सर्वत्र रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. प्रेषितांचे मानवतावादी विचार घरोघरी पोहचविण्याच्या प्रयत्नातून पैगंबर हजरत मुहम्मद (स.) यांच्या जयंती निमीत्त दिनांक १९ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजकां मार्फत सर्वांना विनंती करण्यात आली आहे की, स्वतः रक्तदान करून आपल्या मित्र व प्रियजनांनाही रक्तदान करण्यास प्रोत्साहित करावे व या शिबिरात सहभागी व्हावे.
0 टिप्पण्या