शहरटाकळी प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील व सरपंचसह १२ग्रामपंचायत सदस्य असलेल्या शहरटाकळी ग्रामपंचायतीची मध्ये सरपंचसह सुमारे सात महिला ग्रामपंचायत सदस्य असून देखील महिला ग्रामसभेला सरपंच वगळता एकही महिला ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्याने गावातील महिला मधून व ग्रामस्थ मधून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे .
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसभेपुर्वी एक दिवस अगोदर महिला ग्रामसभा घेणे सर्व ग्रामपंचायातींना बंधनकारक आहे. ग्रामविकास अधिकारी सुभाष गर्जे यांनी नियमानुसार ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर दोन दिवसापूर्वी येथील हनुमान मंदिर सभागृहात महिला ग्रामसभा सोमवार दि.२५ रोजी होणार असल्याची नोटीस प्रसिद्ध केलीे होती व महिला ग्रामसभे विषयी गावात जनजागृती केली होती मात्र सरपंच वगळता एकही महिला ग्रामपंचायत सदस्य महिला ग्रामसभेस उपस्थित राहत नाहीत याबाबत गावातील महिला व ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . यावेळी गावातील आरोग्य व लसीकरण यावर चर्चा करण्यात आली.
0 टिप्पण्या