आळंदी स्मशानभूमीला दोन शववाहक भेट


आळंदी  

शिवतेज मित्र मंडळाचे सदस्य आणि आळंदी शहर शिवसेना उपशहरप्रमुख मंगेश राजेंद्र तिताडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा केला या निमित्ताने त्यांनी त्यासाठी आळंदी स्मशानभूमीसाठी दोन लोखंडी शववाहिनी शिड्या भेट देण्यात आल्या. 

यावेळी माजी विरोधी पक्षनेते डी.डी.भोसले पाटील,नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पाटील,माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे पाटील यांच्याकडे या शिड्या देण्यात आल्या यावेळी स्वराज ग्रुपचे अध्यक्ष आशिष गोगावले,राजेश गोरे,निखिल तापकीर,पंकज भारंबे,राहुल गोरे,अनिकेत डफळ,गणेश मुरकुटे,अनिकेत पाटील,राकेश जाधव तसेच शिवतेज मित्र मंडळाचे सर्व सदस्य आळंदी शहर शिवसेनेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या