वैभव दुध संकलन केंद्राच्या माध्यमातून नारीशक्तीचा गौरव

सुमारे एक कोटी अठ्ठयाण्णव हजारांचा बोनस वाटप


भाळवणी प्रतिनिधी 

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील पंचमहल जिल्हा सह दुध उत्पादक संघ गोध्रा, गुजरात संचलित वैभव दुध संकलन केंद्राच्या माध्यमातून वर्षभर मेहनत करुन आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत असताना दुध व्यवसायाच्या कामात अहोरात्र कष्ट करणार्‍या महिलांचा बोनस बरोबरच साडी - चोळी देऊन सन्मान करण्यात आला. 

वर्षभर शेतीला अनुकूल असणारा दुध व्यवसाय करत असताना पुरुषांच्या बरोबरीने महिलाही अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यांच्या या मेहनतीचा विचार करुन वर्षातला सर्वात मोठा सण दिपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी संस्थेच्या वतीने दुध उत्पादकांबरोबरच सपत्नीक सत्कार करून बोनस वाटप करण्यात आले. यावेळी एकशे सोळा दुध उत्पादकांना सुमारे एक कोटी अठ्ठयाण्णव हजार रुपये बोनस वाटप करण्यात आला.  

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक ह.भ.प. दगडूभाऊ कपाळे होते तर माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम रोहोकले, मंजाभाऊ चेमटे, त्रिंबक भाऊ रोहोकले, बबलूशेठ रोहोकले, सोसायटीचे संचालक गंगाधर रोहोकले, प्रभाकर रोहोकले, उपसरपंच संदीप ठुबे, ज्ञानदेव कुंडलिक, संस्थेचे संचालक संदीप रोहोकले आदींसह परिसरातील दुध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या