अवैध वाळू साठ्यावर छापा


ढोरजळगांव 

निंबेनांदुर (ता.शेवगाव) येथील हद्दीत अवैधरित्या करण्यात आलेल्या वाळूसाठयावर शुक्रवारी ता. ८रोजी महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली. तब्बल ४१ ब्रास अवैधरीत्या साठवलेल्या वाळूसाठ्यावर छापा टाकत मंडलाधिकारी रमेश सावंत यांच्या पथकाने कारवाई केली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, निंबेनांदुर ग्रामपंचायत हद्दीतील मौजे नांदुर विहीरे शिवारातील  गट नंबर ४८ आणि गट नंबर १६/२ मधील क्षेत्रात अवैधरित्या वाळूसाठा असल्याची माहिती महसूल विभागास मिळाली होती.त्यानुसार ढोरजळगाव मंडलाचे मंडलाधिकारी रमेश सावंत यांच्यासह तलाठी चंद्रकांत गडकर, सोनल गोलवड यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी तेथे छापा टाकला असता सुमारे ४१ ब्रास वाळूसाठा आढळून आला. त्याचा पंचनामा ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. या संदर्भात उदय विलास बुधवंत यांनी फिर्याद दिली. तर पंच म्हणून उदय विलास बुधवंत, संजय भानुदास बुधवंत, राजेंद्र गणपत बुधवंत, सह पोलीस पाटील बबन बुधवंत यांनी पंच म्हणून सह्या केल्या तर संबंधितावर महसूल विभागामार्फत पुढील कारवाई करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या