श्रीरामपुरात जनतेने बंद झुगारलाः राठी


श्रीरामपूर

 आघाडी सरकारच्यावतीने पुकारलेल्या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. येथील जनतेने सरकारच्या बंदच्या आवाहनाला सपशेल झुगारल्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

राठी म्हणाले की, राज्यातील हे सरकार आघाडी नसून, बिघाडी सरकार आहे. कोरोनामुळे आधीच हैराण असलेल्या व्यापाऱ्यांना सक्तीने बंद पाळण्यास भाग पाडणाऱ्या या सरकारला श्रीरामपुरातील जनतेने  त्यांची जागा दाखवून दिली. अद्यापरलॉकडाऊनमधून संपूर्ण महाराष्ट्र खुला झालेला नाही. अशातच हा बंद पुकारल्याने जनतेने त्यास प्रतिसाद दिला नाही. या प्रसिद्धी पत्रकावर राठी यांच्यासह भाजपा उपाध्यक्ष  सतिष सौदागर, शहराध्यक्ष मारूती बिंगले, अजित बाबेल, रवी पंडित, सुनील चंदन, अरुण धर्माधिकारी, कडुसकर, जसपालसिंग सहानी, मिलिंदकुमार साळवे, विजय आखाडे, चंद्रकांत परदेशी, राजेंद्र कांबळे, गणेश  अभंग, डॉ. ललित सावज, विशाल अंभोरे, बंडूकुमार शिंदे, विशाल यादव, अक्षय वर्पे, रुपेश हरकल, हंसरामसिंग बतरा, श्रेयस झिरंगे, अमोल अंबिलवादे, गणेश करडे, अक्षय नागरे, गणेश बिंगले यांची नावे आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या