बसस्थानक प्रवेशद्वाराचा 'तो' अपघाती खड्डा पत्रकारांनीच बुजविला


कर्जत 

येथील बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अनेक महिन्यापासून मोठा खड्डा (जवळपास अर्धा फुट खोलीचा) पडला होता. या खड्डयात एसटी बस यासह बसस्थानकात येणारे लहान- मोठे प्रत्येक वाहन आदळत होते. अनेकदा वाहनांचे नुकसान देखील झाले मात्र त्या खड्डयाकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष होत असताना बुधवार, दि २७ रोजी कर्जत तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: पुढे येत अवघ्या १० मिनिटातच तो अपघाती खड्डा बुजविला.

कर्जत बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराला एक भला मोठा खड्डा पडला होता. अनेक महिन्यापासून खड्डयाकडे स्थानिक प्रशासनाने देखील दुर्लक्षच केले. या अपघाती खड्डयात एसटीबस सह इतर वाहने देखील आदळत होती. यामुळे अनेकदा काही वाहनांचे छोटे मोठे नुकसान होत असताना कोणीच त्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हती. यावेळी कर्जत तालुका पत्रकार संघाचे सदस्य डॉ अफरोजखान पठाण यांनी सदरची बाब पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे यांच्या कानावर टाकली असता शिंदे यांनी कर्जत तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी गणेश जेवरे, सुभाष माळवे, मच्छीन्द्र अनारसे, मुन्ना पठाण यांना भ्रमणध्वनीवर संदेश देत तात्काळ बसस्थानकाच्या परिसरात बोलविले. आणि अपघाती खड्डयाची परिस्थिती दर्शवली. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यानी तात्काळ तो अपघाती खड्डा बुजविण्यासाठी स्वताच पुढाकार घेत दगड- खडी- चाळ गोळा करत अनेक महिन्यापासून डागडुजीच्या प्रतीक्षेत असणारा तो खड्डा अवघ्या दहाच मिनिटात समतल केला. यावेळी अनेक उपस्थितांनी कर्जत तालुका पत्रकार संघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत धन्यवाद दिले. बस चालकांनी देखील खड्डा बुजवत असताना पत्रकारांना बस उभा करीत त्यांना धन्यवाद देत आभार व्यक्त केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या