Breaking News

"थलईवा" रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार


नवी दिल्ली

सुपरस्टार रजनीकांत यांना सोमवारी 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान दिला जात आहे. ही माहिती सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी एप्रिलमध्ये दिली होती.

डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल इंडियाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. चाहत्यांमध्ये थलायवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार 25 ऑक्टोबर रोजी देण्यात येत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.


No comments