आळंदी
पेट्रोल डिझेल भाव वाढ संदर्भात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी युवासेनेच्यावतीने श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी युवासेनेने इंधन दरवाढीचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
युवासेनेकडून केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ धोरणा विरोधात निषेध नोंदवण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथून श्री गजानन महाराज मंदिर देहूफाटा पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.शिवसेनेचे मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवासेनेतर्फे इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली.
यावेळी आळंदी शहर युवासेनेचे प्रमुख मनोज पवार,उपशहरप्रमुख निखिल तापकीर, स्वराज ग्रुप चे अध्यक्ष आशिष गोगावले,अनिकेत डफळ,मंगेश तिताडे,चारुदत्त रंधवे,राकेश महेश कु-हाडे तसेच या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसेनेचे व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या